Parbhani City Municipal Corporation, Parbhani
'लोकस्य कर्तृत्व कर्माणि सृजति सर्व सुखे|'

Call (02452) 222 425   |   1800-233-1368   |   1800-233-1285

24/7 Citizen Helpline

About Parbhani City

महाराष्ट्र राज्यातील परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. परभणी शहर महानगर पालिकेचीची स्थापना सन 2011 साली झालेली आहे. परभणी शहर महानगर पालिका “ड” वर्ग महानगर पालिका असून शहराचे क्षेत्रफळ 57.61 चौ.किलोमिटर आहे. परभणी शहराची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची 538 मीटर एवढी आहे. परभणी शहरातील एकुण रस्याची लांबी 692 कि.मी. एवढी आहे. परभणी शहराचे सरासरी पर्जन्यमान सरासरी 750 मि.मी. ऐवढे आहे.

परभणी शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 307170 असून पुरुष 157625 व महिला 149563 लोकसंख्या आहे. 6 वर्षाखालील बालकांची लोकसंख्या 18888 म्हणजेच परभणी शहराच्या 6.15% एवढी आहे. स्त्री-पुरूष लिंग गुणोत्त‍र 948 असून ते महाराष्ट्र राज्याच्या 929 सरासरी लिंग गुणोत्तणरापेक्षा जास्त आहे. परभणी शहराची साक्षरता प्रमाण 73.34% आहे, जे की महाराष्ट्र राज्यातच्या 82.34% सरासरी साक्षरता प्रमाणापेक्षा कमी आहे.

परभणी शहर हे विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद पासुन 210 कि.मी. अंतरावर आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र 222 (कल्याण – निर्मल) यावर स्थित आहे. परभणी शहर हे मनमाड काचीगुडा या रेल्वे लाईन वर तसेच परभणी – परळी या रेल्वे मार्गाच्या जंक्शनवर आहे तसेच परळी वैजनाथ व औंढा नागनाथ या धार्मिक स्थळा पासून 72 कि.मी. व 50 कि.मी. अंतरावर आहे. शहरात हजरत तुराबुल हक्क दर्गा तसेच पारदेश्वर मंदिर असे प्रेक्षणिय स्थंळे असून वसंतराव नाईक कृषी विद्यापिठामुळे परभणी शहराची शैक्षणिक दृष्ट्या वेगळी ओळख आहे. या शहरात मुख्यतः मराठी, हिंदी, दक्कथनी उर्दू, मारवाडी इत्यादी भाषा बोलल्यात जातात. या शहराचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे या ठिकाणी 110 वर्षा पासून प्रसिद्ध संत हजरत तुराबुल हक्क यांच्या नावाने दर वर्षी 02 फेब्रुवारी ला उर्स (जत्रा) भरतो. परभणी परिसरात प्रामुख्याीने ऊस, कापूस, ज्वारी, गहू, सोयाबीन यासारखी सर्व पिके मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते.

परभणी शहराची लोकसंख्या

शहर लोकसंख्या पुरुष महिला बेघर साक्षर पुरुष महिला इतर
परभणी 307170 156520 150650 69 225298 123760 101538 0
एकुण अनुसुचित जाती अनुसुचित जमाती
एकुण 307170 37667 3632
पुरुष 157625 18822 1814
महीला 149563 18845 1818

शैक्षणिक स्थिती

प्राथमिक शाळा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा महाविद्यालय
182 64 22
मनपा अंतर्गत प्राथमिक शाळांची संख्या विध्यार्थी संख्या
18 1023

धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे

परभणी शहर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. या शहरात खालील मुख्ये ठिकाणे आहेत.

  • हजरत तुराबुल हक्क दर्गा
  • रंगनाथ महाराज मंदिर
  • पारदेश्वर मंदिर
  • जाबुळबेट
  • येलधरी धरण
  • ढालेगाव बंधारा
Mayor Photo

Meenatai Sureshrao Warpudkar

Mayor,
Parbhani City Municipal Corporation, Parbhani
Deputy Mayor Photo

Syed Sami Syed Sahebjan

Deputy Mayor,
Parbhani City Municipal Corporation, Parbhani